|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

"दत्तसंप्रदायामध्ये पादुकांचे अतिशय महत्व आहे. प्रत्यक्षातही आपल्या शरीराचा भार हा पायावरती असतो. आपल्या संपूर्ण शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे पायच करत असतात.

संपूर्ण विश्वाचा जर का विचार केला तर equilibrium of centre of gravity, म्हणजेच संपूर्ण विश्वाचा तोल सांभाळण्याचे कार्य, तसेच पंचमहाभूत शक्तींचा समतोल राखण्याचे कार्य ब्रम्हा, विष्णु, महेश ही दत्त - तत्व - त्रयी करत असते.

उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक असलेले हे दत्त - तत्व फक्त सद्गुरुंमध्येच सामावलेले असते, त्यांच्या रूपात वावरत असते. त्या सद्गुरुंच्या पाद्यपूजनाने ही समतोलिक अवस्था प्रत्येकाला साध्य होऊ शकते. त्याचप्रमाणे त्या सद्गुरुचरणांचे प्रतीक असलेल्या पादुकापूजनातून समाजाला उत्तम मार्गदर्शन करण्याचे कार्यही होत असतं. म्हणूनच पादुका पूजनाला अतिशय महत्व आहे."

<< Previous      Next >>