मला निश्चितपणे कोठे जायचे आहे व तिथे जाईपर्यंत मी कसे वागायला हवे याचा विचार प्रत्येकाने आपल्या अंतर्यामी करायला हवा. तसेच आत्मतत्त्व शोधताना आधी स्वतःमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. त्यासाठी देहाची व मनाची योग्य बैठक तयार व्हायला हवी; जी केवळ व्यवहारातही सद्विचारांची सांगड घातल्यानेच होऊ शकते.
जीवन, श्रद्धा व सत्य ही मनुष्य जीवनातील तीन शाश्वत मुल्ये आहेत.यांचा अंगिकार केल्याने मनुष्य शाश्वत आनंद प्राप्त करून घेऊ शकतो.
|