Name: Meghana Shashank Gangatirkar maza anubhav नमो गुरवे निळकंठाय
age-45
name- सौ. मेघना शशांक गंगातीरकर
मी २००५ पासून आनंदयोग धाम या प.पू. भाऊ महाराज यांच्या पादुका-स्थानावर येते आहे. येथे मी दर रविवारची आरती अटेंड करते. आरतीला येऊन मला खूप मानसिक समाधान व आनंद व ऊर्जा मिळते. जीवन जगण्याची नवी दिशा मिळते. आजपर्यंत आनंदयोग धामच्या माध्यमातून मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आनंद मिळाला आहे. पदोपदी लहान-मोठे अनुभव आले आहेत. त्यातीलच एक लहानसा अनुभव मी येथे लिहीत आहे :
काही दिवसांपूर्वी माझे पती श्री. शशांक यांची तब्येत खुप खराब झाली होती. तेव्हा प.पू. श्री. विकास भाऊ आम्हाला सांगत होते की 'तुम्ही टेस्ट करा." पण आमच्याकडुनच उशीर झाला व परिस्तिथी बिघडायला लागली. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोव्हिडची टेस्ट केली. शशांकचं इन्फेकशन जास्त आलं; तर माझं कमी आलं. त्यामुळे शशांकला ऍडमिट करण्याव्यतिरिक्त पर्याय राहिला नाही. त्या वेळेला आमच्या दोघांचा आत्मविश्वास खूप कमी झाला होता. आम्ही खूप घाबरलो होतो. आता पुढे कसं होणार? पण याच वेळेला देह रुपातले गुरु काय करू शकतात, याची प्रचिती आम्हाला आली.
त्या वेळेस श्री विकास भाऊ आम्हाला म्हणाले "तुम्ही घाबरू नका. भाऊ महाराज तुमच्या घरात आहेत. शशांकला काही होणार नाही." त्या वेळेस मी खूप घाबरलेली होती. माझ्या पाया खालची जणू जमीनच सरकली होती. पण वेळो वेळी श्री विकास भाऊंनी मला धीर दिला व म्हणाले "घाबरू नको. काही होणार नाही. शशांक बरा होऊन घरी येणार." त्यांनी काही उपाय करायला दिले. ते पण आम्ही लगेचच सुरु केले .
शशांक ऍडमिट होण्याच्या आधी श्री विकास भाऊंचा फोन आला होता व त्यांनी शशांकला सांगितले "तू घाबरू नको. तुझ्या सोबत भाऊ महाराज, अण्णा महाराज आणि राऊळबाबा आहेत. तू काळजी करू नकोस. सोबत भाऊंचा फोटो घेऊन जा। भाऊच तुला परत आणतील."
जेव्हा ऍडमिट व्हायचं ठरलं तेव्हा खूप साऱ्या हॉस्पिटल्समध्ये आम्ही चौकशी करत होतो. पण कुठेच बेड मिळत नव्हता. अश्या वेळी काय करायच असा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला. त्याचवेळेला मला गुरूंच्या कृपेने शशांकचा मित्र गणेश पाटील याची आठवण झाली. त्याचं राजकीय बॅकग्राऊंड होतं. तेंव्हा त्याला लगेचच फोन केला. तेंव्हा तो म्हणाला "काळजी करू नको शशांक. मी मालाडला तुझ्यासाठी बेड अरेंज करतो. जर तेथे बेड नसेल तर मी तुला अरेंज करून देतो." हे शब्द नक्कीच भाऊ महाराजांचे होते. त्यांच्या कृपेने हॉस्पिटल मिळाले. पण तरी प्रश्न सुटत नव्हता.रेमडीसिवर इंजेक्शन मिळण्यासाठी धडपड सुरु झाली. आनंदयोग धामच्या सर्व भक्तांनी खूप मदत केली. अश्या वेळेला तर माझा भाऊ औरंगाबादला जाऊन इंजेकशन आणण्याच्या तयारीत होता. पण गुरूंच्या कृपेने हॉस्पिटलमध्येच सगळे इंजेक्शन्स मिळाले. जेव्हा इंजेकशनसाठी धडपड चालू होती; तेंव्हा श्री विकास भाऊ शशांकला बोलले की, हॉस्पिटलमधूनच तुझं काम होईल आणि तसेच घडले.
आठ दिवसांनी शशांक बरा होऊन घरी परतला. ही सगळी गुरूंची कृपा आहे. प.पू. श्री विकास भाऊ नेहमी प्रवचनात सांगतात की, देह रूपातल्या गुरूंचं महत्व किती आहे! पण खरं सांगू? मला खूप आतपर्यंत कधी पोहचलच नाही. पण या प्रसंगाने मला खूप काही शिकवलं. गुरूंच्या शब्दांचं, गुरु आज्ञेचं महत्व समजलं. आनंदयोग धामचे आम्ही सर्व भक्त खूप भाग्यवान आहोत की आम्हाला प.पू. श्री विकास भाऊ व प.पू. सौ. श्रध्दाताई गुरूंच्या रूपात लाभले.
भाऊंनी मला काही उपाय सांगितले होते घरात करायला. त्याच्याने माझा धीर खूप वाढला. हळू हळू भीती कमी होत गेली व विश्वास वाटायला लागला की आता सगळं नीट होणार. या सगळ्या परिस्थितीत आमचा मुलगा रुद्रेशने खूप छान साथ दिली. तो खूप स्ट्रॉंग राहिला. तो रोज अघोरकष्टोधारण स्तोत्र शशांकसाठी म्हणायचा. त्याच्या लह्यान वयात या प्रसंगाला तो खूप धीराने सामोरा गेला. तसेच श्री विकास भाऊ व सौ श्रद्धा ताईंच्या सांगण्यावरून आनंदयोग धामच्या सर्व भक्तांनीदेखील शशांकसाठी रोज अघोरकष्टोधारण स्तोत्राचे पठण केले. त्या सर्वांची मी खूप आभारी आहे.
या सगळ्या प्रसंगात प.पू. सौ.श्रद्धा ताई व प.पू. श्री विकास भाऊं खंबीरपणे उभे तर राहिलेच; पण सगळ्या गोष्टी नीट होण्यासाठी खूप धडपड केली. सतत आमच्या संपर्कात राहून आमची चौकशी करत होते व धीर देत होते.
परमपूज्य सद्गुरू भाऊ महाराज तसेच प.पू. सौ. श्रध्दा ताई व प.पू. श्री विकास.भाऊंची अशीच कृपा व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत, हीच सद्गचरूंच्या चरणी विनंती. -------------------------- |