Name: Sama Rane My Experience मी समा राणे.
वय - 52
मी १ मे २००९ पासून (गेल्या १२ वर्षांपासून) आनंदयोग धाम या परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांच्या पादुका स्थानावर येत आहे. स्थानावरील एक भक्त सौ. धारा गणात्रा हिला मी ओळखते. तिनेच मला हे गुरूस्थान दाखवले.
सुरुवातीला मी गुरूवारी व रविवारी आरतीला येत होते. मग मला सोमवारी आरती करायला श्री विकास भाऊंनी सांगितले. मग गुरूवारी, रविवारी आरतीला येत नव्हते. २०१५ मध्ये श्री विकास भाऊंनी दर रविवारीही आरतीला यायला सांगितले. ते मी आजतागायत येते आहे. मला आनंदयोग धाम या गुरु-स्थानावर परमपूज्य श्री विकास भाऊ आणि परमपूज्य सौ. श्रध्दाई यांच्या माध्यमातून खूप आनंद मिळतो. मनाला शांती मिळते. या ठिकाणी मला खूप चांगल्या अनुभूती मिळाल्या आहेत. त्यातीलच एक ह्रद्य अनुभूति मी इथे लिहित आहे.
एकदा सहजपणे बोलताना माझ्या एका मैत्रिणीने -ज्योतीने, जी क्रिया योग शिकवते, तिने मला विचारले की "इतकी वर्ष तू गुरू स्थानावर जातेस, मग तुझे सदगुरू तुझ्या हृदयात आहेत याची प्रचिती तुला मिळते का? त्यांना बघितल्यावर तुझ्या डोळयात आसवे येतात का?" मी विचार केला आणि तिला "नाही" म्हणून सांगितले. मला फार मनाला लागले की, माझे सदगुरू का माझ्या हृदयात नाहीत? तशी अनुभूती मला का येत नाही? नंतरच्या सोमवारी आरतीला सूरुवात करण्याआधी मी सदगुरू भाऊ महाराजांना मनोमनी विचारले की "तुम्ही माझ्या हृदयात आहात का?" आणि आरती म्हणू लागले. थोडया वेळाने मी आरती म्हणताना रडू लागले. श्री विकास भाऊ थोडया अंतरावर बसले होते. आरती संपली तसे त्यांनी मला विचारले की "का रडत होतीस? घरी, पार्लरमध्ये काही झाले आहे का?" मी "नाही" म्हटले. रडण्याचे काहीच कारण नव्हते. म्हणून "सर्व ठीक आहे" असं म्हणाले. मला 'विनाकारण' रडू आल्याने मीच चकित झाले होते.
पुढच्या सोमवारी पण वर सांगितले तसेच पुन्हा घडले. आणि विकास भाऊंनी तोच प्रश्न केला. मीही त्याच विचारात होते आणि लख्खकन् माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी लगेच म्हणाले की "सद्गुरू भाऊंना मी आरती करताना मनात विचारले होते की तुम्ही माझ्या हृदयात आहात का? सद्गुरू भाऊंना समोर बघताना मला रडू आले. माझ्या प्रश्नाचं ते उत्तर होतं."
आता माझे सद्गुरू माझ्या हृदयात, माझ्याबरोबर, माझ्या कुटुंबासोबत आहेत ही मला खात्री आहे. त्यांच्याकडे आता काही मागणे नाही. न मागताच ते देताहेत. या कठीण काळात ही आनंदी आनंद आहे. त्यांनी आपल्या पदरात घेतलं म्हणून मी सदैव कृतज्ञ आहे. आनंदयोग धामचीही मी कृतज्ञता व्यक्त करते. -------------------------- |